Ad will apear here
Next
कथ्थक नृत्यातून उलगडले चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब
डॉ. अच्युत आपटेंच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन


पुणे : चित्रपटांतील गाणी, कविता शास्त्रीय नृत्यातून मांडत प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्यातून चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब उलगडले. गणेश वंदना, कृष्णलीला, दुर्गेचे रूप यांच्या बहारदार सादरीकरणाने शर्वरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘वन्स मोअर’ आणि टाळ्यांचा कडकडाटात दाद मिळवली.

विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक प्रसिद्ध गणिततज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘फुट प्रिंट्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. संस्थेचे देणगीदार, हितचिंतक, आजी-माजी विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘मुघल-ए-आझम’मधील मुजर्‍याने कार्यक्रमाची सांगता झाली. निवेदन मधुराणी प्रभुलकर यांनी केले. या प्रसंगी समितीच्या कार्यावर आधारित ‘आधारवड’ या लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले.
 
या वेळी माहिती देताना कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने डॉ. आपटे यांनी विद्यार्थी सहायक समितीची १९५५ मध्ये स्थापना केली. तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले समितीचे कार्य आता विस्तारले असून, शहरात पाच वसतिगृहांतून सुमारे ७७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे.’



‘आपटे यांचे जन्मशताब्दी वर्ष आठ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरू झाले आहे. समितीच्या माध्यमातून केवळ वसतिगृह चालविले जात नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून स्वावलंबनाचे धडे देत चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यात येते. समितीची वसतिगृहे म्हणजे परिवर्तनाची आणि व्यक्तिमत्व विकासाची केंद्रे आहेत. नवीन वसतिगृहासह कौशल्य विकास प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यासिका, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVQBW
Similar Posts
विद्यार्थी सहायक समितीतर्फे पोपटराव पवार यांचे व्याख्यान पुणे : विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व थोर गणितज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती आणि उचित माध्यम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाई गरजेची’ पुणे : ‘स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरुणाई, मात्र अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. तरुणांनी हा विचार बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा. कारण राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाईची
‘अखंड घुंगरू नाद’मधून रोहिणी भाटे यांना आदरांजली पुणे : कथ्थक नृत्यासाठी आयुष्य वेचण्याबरोबरच त्या परंपरेचा धागा जपत या नृत्यप्रकारात सर्जनशील प्रयोग करणाऱ्या गुरू रोहिणी भाटे यांना त्यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी १४ व १५ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘अखंड घुंगरू नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘समितीमुळे आयुष्याला दिशा मिळाली’ पुणे : ‘गावाकडून पुण्यात आल्यानंतर शहराची ओळख झाली, शिक्षणाच्या विविध वाटा सापडत गेल्या. जगण्याला शिस्त लागली. जीवनातील शाश्वत मूल्ये अंगीकारता आली. विद्यार्थी सहायक समितीतून मिळालेल्या संस्कारामुळे आयुष्याला दिशा मिळाली,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि विद्यार्थी सहायक समितीचे माजी विद्यार्थी डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language